रोकड जप्ती प्रकरण: वैद्यनाथ बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल

मुंबईतील कारवाईत १० कोटी १० लाख रुपये जप्त केल्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि  त्यांच्या बहिण खासदार प्रीतम मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या व्यवस्थापकांसह तिघांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आमच्याकडे बँकेच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. पंकजा मुंडे यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे या बँकेच्या संचालिका आहेत.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी बँकेच्या १० कोटी १० लाखांची रोकड मुंबईत जप्त करण्यात आली होती. २५ कोटी रुपयांची रक्कम परळी-वैजनाथ येथून तेथील राष्ट्रीयीकृत बँकांनी न स्वीकारल्याने १७ नोव्हेंबर रोजी मुंबईला पाठविली. त्यापैकी पिंपरी-चिंचवडला नेण्यात येत असलेली रक्कम पकडण्यात आली, असे बँकेतर्फे सांगण्यात आले होते.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget