Latest Post

मुंबई- (प्रतिनिधी)-ल्फिन्स्टन चेंगराचेंगरी घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांच्या कपाळावर केईएम रुग्णालयानं मार्कर पेननं आकडे टाकल्या प्रकरणी वातावरण गंभीर झाले होते. याच प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायलयानंदेखील राज्य सरकारचे काम उपटलेत. मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशी शिकवणी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिली. त्याचबरोबर केईएम रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
मृतांच्या कपाळावर आकडे टाकल्याप्रकरणी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, मृतांच्याकुटुंबियांना 15 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, आदी विनंती सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर आणि अॅड. नितीन सातपुते यांच्यातर्फे फौजदारी जनहीत याचिका केलीय.   


मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –  मुंबई पालिकेच्या कांदिवली येथील प्रभाग क्र २१ च्या पेाटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर या विजयी झाले आहेत. यांनी ७१२२ मते मिळवून विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाले (मकवाणा) यांचा पराभव केलाय. या विजयामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या एकने वाढली असून आता ८३ झालीय.
भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्र २१ मध्ये पेाटनिवडणूक घेण्यात आली. भाजपने त्यांच्या सून प्रतिभा गिरकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. आज झालेल्या मतमोजणीत प्रतिभा गिरकर यांच्या पारडयात ९५९१ मते तर काँग्रेसच्या निलम मधाळे (मकवाणा)यांना १९८४ मते मिळाली. या पोटनिवडणूकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी भाजप आमदार भाई गिरकर आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच, गिरकर परिवाराचे आणि शिवसेनेचे जुने संबंध असल्यामुळे गिरकर कुटुंबीयांचा उमेदवार या पोटनिवडणूक असल्यास शिवसेना या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपला पाठींबा दिला हेाता. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. पोटनिवडणुकीत २८.७५ टक्के इतके कमी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ६ हजार ६३१ पुरूष व ५ हजार १७३ स्त्रीया असे एकूण ११ हजार ८०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.


मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) –  स्वाती चांदोरकर लिखीत हिज डे कादंबरीचे तृतीय पंथांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा सोहळा जी एम एस बँक्वेट. न्यू लिंक रोड डी एन नगर येथे करण्यात आला. यावेळी प्रवीण दवणे,  प्रदीप वेलणकर. प्रमोद पवार. चंद्रकांत मेहेंदळे. माधवी बांदेकर, निवेदिका हेमांगी आणि प्रमुख पाहुणे म्हणून ट्रान्स जेंडर संजीवनी मधुरी शर्मा, व विकी शिंदे उपस्थित होते. प्रवीण दवणे यांनी त्यांचे विचार यावेळी वेक्त केले. “हिज डे” कादंबरी हि ट्रान्स जेंडर, त्यांच्या वेदना क्लेश समस्या यावर आधारित असून ती सत्य आणि काल्पनिक यांची गुंफण आहे. या कादंबरी चे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस ने केले आहे.
स्वाती चांदोरकर यावेळी म्हणाल्या तृतीय पंथी लोकांबद्दल आजपर्यंत लिखाण झालेले नाही असे नाही. लोकांना त्याच्या बद्दल जाणूनं घेण्याचे असते परंतु त्यांच्या बदल भिती असते, म्हणून लोक त्यांना टाळतात. त्यामुळे या आधुनिक जगात ते समाजापासून दुरावलेले आहेत. मला त्यांच्या समस्या, त्यांची जगण्याची धडपड, त्यांची तडजोड त्यांच्या वेदना त्यांच्या व्यथा, या बदल जाणून घेण्याची उत्सुकता होती. तसेच त्यांच्या समाजाकडे असणाऱ्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचवणं मला गरचेच वाटलं. यासाठी जे जे काही त्यांच्या कडून समजले ते मी या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रसंग जरी काल्पनिक असले तरी त्याला सत्याची साथ आहे. त्यांना चांगल आयुष्य हवं आहे ... आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचे एकाच मागणं आहे ... " आम्हाला माणूस म्हणून जगू द्या " मी त्यांचे हेच मागणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या “हिज डे” या माझ्या कादंबरीतून केला आहे.


 मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) –  मुंबई आणि सेंट पिटर्सबर्ग (रशिया) या दोन भगिनी शहरांचे संबंध ५० वर्षात घट्ट निर्माण झाले असून आगामी काळात शिक्षण, व्‍यापार आणि सांस्‍कृतिक क्षेत्रातील आदानप्रदानाव्‍दारे ते आणखी वृंध्‍दीगत करण्‍यावर भर देणार असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
मुंबई आणि सेंट पिटर्सबर्ग या दोन शहरांच्‍या भगिंनी शहर संबंधाना ५० वर्ष पूर्ण झाल्‍यानिमित्त पालिकेच्‍या वतीने सेंट पिटर्सबर्गच्‍या पाहुण्‍यांसाठी तीन दिवसीय सांस्‍कृतिक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. हा कार्यक्रम  नरीमन पॉईन्‍ट येथील हॉटेल ट्रायडेन्‍टमध्‍ये करण्‍यात आला, त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सेंट पिटर्सबर्ग शहराच्‍या अर्थ विभागाच्‍या प्रमुख श्रीम.ईलिना फेडोरोव्‍हा, रशियाचे मुंबईतील वाणिज्‍य दूत अॅड्री झिलोत्‍सव्‍ह, सेंट पिटर्सबर्ग शहराच्‍या शिक्षण विभागाच्‍या प्रमुख एकतरिना स्‍टेपनोव्‍हा, सेंट पिटर्सबर्ग शहराचे आंतरराष्‍ट्रीय संबंधांचे प्रमुख अलेक्‍सी वोरनको,  विरोधी पक्षनेते  रवि राजा, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख,   सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त (शहर) ए.एल. जऱहाड,  सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे,  बाजार व उद्यान समिती अध्‍यक्षा सान्‍वी तांडेल, महिला व बाल कल्‍याण समिती अध्‍यक्षा  सिंधू मसुरकर,  उप आयुक्तांनी (परिमंडळ -१ ) सुहास करवंदे हे मान्‍यवर उपस्थित होते. 


मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबईत आता पालिकेच्या 
अग्निशमन दलाच्या जवानांना  विजेच्या तारा,झाड आणि घरांच्या छतावर अडकणारे पक्षी काढण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागणार नाही आणि जवनांना  जिव धोक्‍यात घालण्याची गरज पडणार नाही. हे पक्षी काढण्यासाठी टेलिस्कोपिक रॉड विकत घेण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला आहे
मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून ही नगरी 24 तास गजबजलेली असते या नगरीत कुठे आग , अडकलेले पक्षी लहान मोठ्या घटना घडल्या की आपला जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान घटनानाचा सामना करून लोकांचा जीव वाचवत असतात.  मुंबई सेंट्रल येथे विजेच्या तारेला अडकलेला पक्षी काढताना शॉक लागल्याने उपचारादरम्यान गेल्या वर्षी अग्निशमन दलाचा जवान रविंद्र भोजणे यांचा मृत्य झाला होता. त्यापुर्वी अशाच काही दुर्घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलात सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीने अग्निशमन दलाला पक्षी सोडविण्याचे काम दिले जाऊ नये अशी शिफारस केली होती. या शिफारशीला दिड वर्ष उलटून गेल्यानंतरही हे काम अग्निशमन जवान करत आहे. पक्ष्यांसाठी जवानांना जिव धोक्‍यात घालवावा लागत आहे. दरवर्षी तब्बल साडे चार हजार हून अधिक पक्षी जवान वाचवतात. मात्र,त्यासाठी स्वत:चा जिव धोक्‍यात घालवावा लागतो. अडकलेले पक्षी सोडविण्यासाठी जवनांना स्वत:चा जिव धोक्‍यात घालावा लागू नये म्हणून टेलिस्कोपिक रॉड विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अग्निशमन दल 16.56 मिटर लांबीचे 35 रॉड विकत घेणार असून त्यासाठी 77 लाख रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक अग्निशमन केंद्रासाठी एक रॉड देण्यात येणार आहे. हे रॉड वजनाने हलके असल्याने ते हाताळणे शक्‍य होईल असा दावा करण्यात येत आहे.
  • शहरात 17 ठिकाणी मिनी फायर स्टेशन

मुंबईत लोकांची संख्या वाढत आहे तशी वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे या वाहतुक कोंडीमुळे अग्निशमन दलाचे मोठे बंब पोहचण्यात अनेक वेळा विलंब होतो. तसेच दाटीवाटीने वाढलेल्या झोपड्यांमधून जातानाही बंबांना अडथळे येतात.त्यासाठी शहरात 17 ठिकाणी मिनी फायर स्टेशन उभारुन त्यांत लहान बंब वापरण्यात येणार आहे. त्यासाठी कंटेशनराईज्ड कार्यालय विकत घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.या 17 कार्यालयांसाठी एक कोटी 96 लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) –  मुंबईतील जुने आणि प्रसिद्ध असलेल्या भायखळा मार्केट येथील ब्रिटिशकालीन रेल्वे फुटओव्हर  पूल नव्याने बांधून पूर्ण झाला असून पालिकेकडून पादचाऱ्यांकरिता खुला करण्यात आला आहे. गेले दोन वर्ष सदर पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय या पुलाचे काम पूर्ण झाल्याने दूर झालीय. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पुलासाठी गेली दोन वर्ष तत्कालीन स्थानिक नगरसेविका वंदना गवळी आणि विद्यमान प्रभाग समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी पालिकेकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर पूल तयार होऊन जनतेसाठी वेळेत उपलब्ध झाला आहे.                                         
 मुंबईतील प्रसिद्ध भायखळा मार्केट येथील भायखळा पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे पादचारी पूल अतिशय धोकादायक स्थितीत झाल्याने दोन वर्षांपूर्वी  पाडून टाकण्यात आला होता. सदर पूल बंद झाल्याने  तसेच नवीन पुलाच्या बांधकामास न्यायालयीत  आव्हान दिल्याने विलंब झाला . त्यामुळे या परिसरातील सुंदर गल्ली ,मदनपुरा,दगडीचाल,आग्रीपाडा , सातरस्ता, भायखळा मुस्तफा बाजार येथील नागरिकांना तसेच एन्झा स्कुल ,आणि  ग्लोरिया स्कुल या शाळेतील विद्याथ्यांना मोठा वळसा घालून ये-जा करावी लागत होती. स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन तत्कालीन अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका वंदना गवळी आणि विद्यमान ई वार्ड प्रभाग समिती अध्यक्ष गीता गवळी यांनी पालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन पालिकेने सादर ठिकाणी नव्याने पूल उभारण्याचा निर्णय घेतला. आज गेल्या दोन वर्षांच्या प्रयत्न्नांना यश येऊन येथील जनतेसाठी जनतेसाठी सादर पूल खुला करण्यात आला आहे. यामुळे गेले दोन वर्षांपासून येथील नागरिकांची तसेच विद्याथ्यांची गैरसोय दूर झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.  


पालिका र-थायी समितीत पडसाद
मुंबई ( प्रतिनिधी ) –  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील  रस्ते दुरुस्तीचे कंत्राट काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांना पुन्हा देण्यात आलेय. या प्रकरणी पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद उमटलेत. सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरला. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या एकाच पावसात नव्याने दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असल्याचा सुर लावून धरला होता.
पालिका स्थायी समितीच्या बैठकीत  शुक्रवारी रस्त्यांवर चर्चा करण्यास आली. ज्या रस्त्यांचा पाया चांगला आहे, त्या रस्त्यांची संपुर्ण दुरुस्ती न करता फक्त डांबराचे वरचे आवरण नवे टाकण्याचा (भुपृष्टीकरण)निर्णय आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला. अशा पध्दतीने काही रस्त्यांची दुरुस्तीही करण्यात आली.मात्र,ओखी वादळामुळे झालेल्या पावसात या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहे असा आरोप आज करण्यात आला.योग्य पध्दतीने रस्त्यांची दुरुस्ती झाली नसल्याचा आरोप करत आयुक्त अजोय मेहता यांनी स्वत: पाहाणी करुन खातरजमा करावी असे आव्हान सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिले. तर,रस्ते दुरस्तीची संपुर्ण माहिती सादर करावी अशी मागणी भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली.

कॉंग्रेसच्या आसिफ झकेरीया यांनी रस्ते दुरुस्तीत नवा घोटाळा होत असल्याचा आरोप केला.काळ्या यादीतील कंत्राटदारांना रस्ते दुरुस्तीचे काम देण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.त्याच बरोबर वस्तु व सेवा करामुळे काही रस्ते दुरुस्तीचे काही प्रस्ताव रद्द करण्यात आले होते.त्या रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार असा प्रश्‍नही सदस्यांनी उपस्थीत केला.

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget